ख्रिस्ती नवनिर्माण सेवा उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष निलेश चक्रनारायण यांचा माजी मंत्री थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली शहरात पक्ष संघटना बांधणीचे काम करणार – चक्रनारायण 

अहमदनगर प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश ख्रिस्ती नवनिर्माण सेवा उद्योग व व्यवसाय विभागाचे प्रदेशाध्यक्ष निलेश चक्रनारायण यांनी नुकत्याच संगमनेर येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी चक्रनारायण यांचे अनेक समर्थक देखील काँग्रेसमध्ये दाखल झाले. 

चक्रनारायण हे मागील सुमारे बारा वर्षांपासून शहरामध्ये सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत. ख्रिस्ती नवनिर्माण सेवा संघटनेच्या उद्योग व व्यवसाय विभागाच्या माध्यमातून त्यांनी आजवर ख्रिस्ती समाजातील युवकांना उद्योग, व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. या माध्यमातून समाजातील अनेक तरुणांचा फायदा झाला आहे. 

ख्रिश्चन समाजाबरोबर शहरातील इतर घटकांसाठी देखील त्यांनी कार्य केले आहे. रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, जेष्ठ नागरिकांना मदत करणे, अपघातग्रस्त्यांना मदत करणे विधवा परित्यक्ता, निराधार, महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे अशा विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून त्यांनी आजार अनेकांना मदत केली आहे. 

चक्रनारायण हे काँग्रेस प पक्षाच्या माध्यमातून शहरामध्ये चांगली संघटनात्मक बांधणी करतील असा विश्वास माजी मंत्री थोरात यांनी व्यक्त केला आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले की, चक्रनारायण यांच्यावर आगामी काळात पक्षामध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून शहरातील विविध घटकांचे संघटन होईल अशी मला खात्री आहे. 

या प्रवेशाच्या वेळी व्यासपीठावर पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. लहू कानडे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, महानंदाचे चेअरमन इंद्रजीत थोरात, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, भिंगार शहर काँग्रेसचे सागर चाबुकस्वार, बाळासाहेब भिंगारदिवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.