
अहमदनगर : ह. कृ. तथा बाळासाहेब काळे ज्यांचे विचार समकालीन समाजासाठी प्रेरणादायी आहेत. ते स्वतः उच्चशिक्षित असून ही त्यांनी नोकरी न करता अहमदनगर सारख्या दुर्गम जिल्ह्यातील कष्टकर्यांच्या शेतकर्यांच्या आणि बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अविरतपणे कार्य केले. त्यांच्या याच विचारांचा वारसा अविरतपणे चालवण्याचं काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था करत आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय कळमकर यांनी केले.
भाषण कसे असावे याविषयी त्यांनी भाष्य केले व भाषणातील नैसर्गिकता लोप पावत चाललयाची खंत त्यांनी येथे व्यक्त केली.नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे आयोजित कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेमध्ये राज्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील 22 विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. परीक्षक म्हणून डॉ. संतोष पवार व डॉ. संजय दरवडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा कदम यांनी केले. प्रास्ताविक डॉ. के एम. अंबाडे यांनी केले. आभार मानले.डॉ. मीना साळे यांनी मानले. पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एच झावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. मेधाताई काळे उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे आभार डॉ. राजेंद्र साबळे यांनी मानले.
स्पर्धेत बेलापूरच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रणाली पांडुरंग पाटील हिने 2500 रुपये रोख पारितोषिक आणि प्रथम क्रमांकाचा फिरता करंडक पटकावला. दुसरे बक्षीस न्यू आर्टस् कॉलेज पारनेर रुपये 2000/- रुपये रोख व प्रमाणपत्र सपना तुकाराम ठाणगे, तिसरे बक्षीस 1500 रुपये रोख आणि प्रमाणपत्र रामहरी कल्याण जाधव याला मिळाले. उत्तेजनार्थ पाहिले पारितोषिक 1100 रुपये रोख आणि प्रमाणपत्र जठार ऋतुजा बाबासाहेब हिला तर , दुसरे पारितोषिक रू 1001 व प्रमाणपत्र कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आणि ढोकणे सोमनाथ भाऊसाहेब, ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा यांनी मिळवले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे उपस्थित सर्वानी अभिनंदन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे हे उपस्थित होते. त्यांनीही ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व सहकारी क्षेत्रातील कार्याला उजाळा दिला. यावेळी माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव काळे, अशोकराव काळे, प्रा. पोपटराव काळे, प्रा. मेधाताई काळे, सौ. अरूणाताई काळे, प्रा आरती साबळे, प्रा. सुनील मांढरे सर, प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बी.बी. सागडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. ई. आठरे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस.बी. कळमकर पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य शिवाजी साबळे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रा. निलेश लंगोटे प्रा. निखिल गोयल, प्रा. मयूर रोहोकले, प्रा. सचिन काळे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.