अहमदनगर (दि ९ जुलै २०२२)- कल्याण रोड, ड्रिेमसिटी मागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रशालेपासून ड्रिमसिटीपर्यंत टाळमृदुंग गजर करत विठोबा -रखुमाई, संत तुकाराम महाराज अभंग म्हणत सुरूवात झाली. ‘तो पहा विठ्ठल बरवा.. तो हा माधव बरवा.. संगीतमय वातावरण नाचत फुगडी अशा भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. ड्रिमसिटी जवळ रिंगण करण्यात आले. विठ्ठल नामाचा गजर… संतांची- वारकरांची वेषभुषा केलेले विद्यार्थी व शिक्षक, जनजागृतीपर फलकांनी या दिंडीमुळे परिसर विठ्ठलमय झाला होता.

     शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार कृष्णाजी बागडे, निमंत्रित सदस्य बाबासाहेब वैद्य, सौ. सुरेखा ताई शेकटकर, सौ.शुभदाताई वल्ली, मुख्याध्यापिका सौ.कल्पना भामरे सर्व शिक्षक शिक्षिका, पालक आणि वारकरी पोषाख परिधान करून बाळगोपाळ सहभागी झाले होते.

     पालकही उत्साहात सहभागी होऊन आनंद द्विगुणित केला. दिंडी यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक  जगन्नाथ कांबळे,  सुशिलकुमार आंधळे, राजेंद्र गर्जे, चंदा कार्ले, रूपाली जाधव, एकता काळे, यांनी परिश्रम घेतले. दिंडीच्या सांगता प्रसंगी महाप्रसाद गोड शिरा विद्यार्थ्यांना देण्यात आला.  मुख्याध्यापिका सौ.कल्पना भामरे यांनी आभार मानले.