साई मंदिरात भजन संध्या- नवदाम्पत्यांच्या हस्ते आरतीने 2022 ला निरोप

        नगर – आपण ज्या गोष्टींची अपेक्षा करतो ती पूर्ण होणे म्हणजे समाधान आणि अपेक्षापूर्ती नंतर जो काही आपल्या मनातून हर्ष होतो, तो म्हणजे आनंद आणि हे साध्य करण्यासाठी साईबाबांवर असलेली श्रद्धा, सबुरीचे फळ म्हणजे आशिर्वाद हा एक कृपाप्रसादच असतो, असे प्रतिपादन प्रथमेश गोरे यांनी केले.

     वसंत टेकडी येथील संदेशनगर मधील द्वारका साई मंदिरात 2022 वर्षाला निरोप देण्यासाठी भजन संध्या व  नवदांम्पत्यांच्या हस्ते आरती व महाप्रसाद असा उपक्रम साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला. यावेळी श्री.गोरे बोलत होते.

     याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल त्र्यंबके, योगेश पिंपळे, बबलू सूर्यवंशी, अमर मेट्टू, आकाश त्र्यंबके, महेश पंडित, कांचन बिडवे, सरला सातपुते, अविनाश कराळे, संजय लोळगे, राजू भिसे आदि मान्यवर उपस्थित होते.

     श्री.साईबाबांची महाआरती नव वधू-वर श्री.व सौ. कोमल प्रथमेश गोरे, श्री. व सौ. प्रिती अक्षय पवार, श्री. व सौ.स्नेहल राहुल सोनवणे यांचे हस्ते करण्यात आली. प्रमुख पाहुणे जनरल मॅनेजर अविनाश कराळे, नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष संजय लोळगे, मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी राजू भिसे यांचा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात आला.

     प्रास्तविकात नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाआरती, महाप्रसादासाठी भाविकांचे खुप मोठे योगदान असल्याने उपक्रम राबविता येतात, असे सांगितले.

     यावेळी रेणुका भजनी मंडळाच्या हेमा पडोळे यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत साईंची भजने सादर केली.  गायनासाठी प्रसाद शेटे यांनी साथ दिली. त्याला चांगला प्रतिसाद भाविकांनी दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्य करणार्‍यांचे योगेश पिंपळे यांनी सर्वांनी आभार मानले.