
प्रदर्शन पहा, मशाल व फुलेवाड्या सोबत सेल्फी काढा,भाषण करा
अहमदनगर- नवीन वर्षाचा पहिला उत्सव म्हणून 3 जानेवारीला महाराष्ट्रभर सावित्री उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक कार्याला अभिवादन करुया त्यांचे ऋण व्यक्त करु या. दि. 3 जानेवारीला सकाळी 8 30 ते 10 या वेळेत स्थळ – प पू रावसाहेब पटवर्धन स्मारक, समर्थ शाळा सावेडी समोर,भिस्तबाग रोड, अहमदनगर या ठिकाणी फक्त 10 मिनिट वेळ काढून या कृतज्ञता व संकल्प सोहळ्याला सर्वांनी यावे असे आवाहन सावित्री उत्सवाचे स्वागताध्यक्ष व भैरवनाथ कंन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक उद्योजक अनिल जावळे व विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले, संगीता गाडेकर, श्रीकांत वंगारी, नंदाताई माडगे, सुरेखा घोलप, आदींनी केले.
3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा दिवस अहमदनगर सह महाराष्ट्रभर सावित्री उत्सव म्हणून साजरा होत आहे. सावित्रीबाई फुले व फातिमा शेख या दोघी अहमदनगरमध्ये शिक्षण घेवून भिडेवाड्यात पहिली शाळा सुरु केली आणि बहुजन समाज शिकू लागला. त्यांच्या फुले दांपत्यांच्या समग्र सत्कार्याला अभिवादन या निमित्ताने करण्यासाठी कृतज्ञता व संकल्प समारंभ आयोजित केला आहे.
या ठिकाणी या पुष्प अर्पण करा, अभिवादन करा,फुलेवाड्या सोबत, ज्ञानक्रांती ज्योत सोबत सेल्फी घ्या. सर्वांसाठी खुला मंच ठेवला आहे वाटले तर छोटेसे भाषण करा.फोटो व विचार प्रदर्शन पहा… आणि सामाजिक संकल्प करा आपल्या कुटुंब, सहकारी व मित्र परिवारासह या त्यासाठी फक्त 10 मिनिटे द्या आपल्या आपल्या घरी नवीन वर्षातील पहिला सण म्हणून महिलांनी कपळावर चिरी (आडवा गंध ) लाऊन आणि सायंकाळी दारात रांगोळी काढून विवेकाचा दिवा लावून साजरा करावा असे आवाहन जिज्ञासा अकादमी, राष्ट्र सेवा दल, प.पु. रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती, महारष्ट्र साखर कामगार महासंघ. महानगरपालिका कामगार युनियन, नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठान, सावली, अहमदनगर रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, मिशन माणुसकी, लायन्स क्लब ऑफ ( मिडटाऊन), चर्मकार विकास संघ, रहेमत सुलतान फाउंडेशन, गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान, पीस फाउंडेशन, उर्जिता फाउंडेशन, शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य, पद्मशाली युवा शक्ती, नगर जल्लोष (ट्रस्ट) परिवार, पद्मशाली स्नेहीता संघम, स्त्री जन्माचे स्वागत समिती, पाइपलाईन वस्तीस्तर संघ, क्रांतीअसंघटीत कामगार संघटना, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. आदी संस्थांच्या वतीने करण्यात आले.
————-