बारा बलुतेदार महासंघाच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार

पदाचा उपयोग समाज हितासाठी करावा-आ.संग्राम जगताप

     नगर – सामाजिक क्षेत्रात काम करतांना समाजसेवेचे व्रत म्हणून काम केले पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटतात. बारा बलुतेदार महासंघाने जिल्ह्यातील समाजासाठी भरीव काम केले. या संघात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नूतन पदाधिकार्‍यांनी पदाचा उपयोग हा समाजहितासाठी करावा, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

     सावेडी उपनगरात बारा बलुतेदार महासंघाच्या संपर्क कार्यालयात नवीन वर्षानिमित्त काही नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. या सर्वांचा सत्कार आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, उपाध्यक्ष अनिल इवळे, शहराध्यक्ष शाम औटी, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, जालिंदर बोरुडे, अ‍ॅड.मनोज जायभाये, श्रीकांत मांढरे, मच्छिंद्र बनकर, लवेश गोंधळे, सचिन वारे, कुलदिप भिंगारदिवे, संदिप घुले, सागर नांदुरकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

     आ.जगताप पुढे म्हणाले, नवीन निवड झालेले पदाधिकारी हे समाजातील प्रतिष्ठीत व समाजातील प्रश्नांची जाण असलेले व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे मिळालेल्या पदाच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करतील. त्याचबरोबर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठबळ मिळणार असल्याचे सांगून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

     प्रास्तविकात जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड म्हणाले, बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून सर्व समाजाची उन्नत्तीसाठी सर्व एकसंघ काम करत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्नही मार्गी लागले आहेत. नूतन पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन केले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल इवळे यांनी केले तर  अ‍ॅड.मनोज जायभाये यांनी आभार मानले.