अहमदनगर : शहरात नव्याने सुरु झालेल्या चैतन्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहून हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैद्यकीय सुविधा या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये नगरकरांना तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उत्तम वैद्यकीय उपचार मिळतील असा विश्वास आहे.

या उदघाटन सोहळ्यास आमदार लहुजी कानडे, मा.आ. अरुणकाका जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, आमदार शंकरराव गडाख, मा.आ. चंद्रशेखर घुले, महापौर रोहिणीताई शेंडगे, मा.स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, महापालिका आयुक्त पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मा.महापौर बाबासाहेब वाकळे,

साईदीप हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. एस.एस.दीपक, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका दिपालीताई बारस्कर, सभागृह नेता विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका मीनाताई चव्हाण, नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेवक स्वप्नील शिंदे, नगरसेवक बाळासाहेब पवार, मा.नगरसेवक अशोक कानडे,

कॅनरा बँकेचे अमित पाल, मा.जि.प.अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सरपंच रामेश्वर निमसे, हॉस्पिटलचे संचालक डॉ. अरुण बोरुडे, संचालिका डॉ. स्वाती अरुण बोरुडे, डॉ. विश्वजित पवार, डॉ. किरण गोरे, डॉ. किरण दीपक, डॉ. योगिता पवार, डॉ. अश्विनी गोरे, डॉ. धनंजय वारे, डॉ. गजेंद्र गिरी, डॉ. भूषण खर्चे, डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. भगवान कराळे, डॉ. विशाल खराडे, डॉ. तुषार खराडे, डॉ. स्नेहल खराडे, उद्योजक अंकुशरावजी कानडे, उद्योजक संतोषराव कांबळे, मुख्याध्यापक सुरेशराव शेवाळे, त्रिमूर्ती मेडिकल आणि साई चैतन्य पॅथॉलॉजी लॅब चे कर्मचारी, हॉस्पिटल मधील इतर आरोग्यसेवक आणि स्टाफ आदी उपस्थित होते.