(Bagul Panduga File Photo)

अहमदनगर (दि ९ जुलै २०२२) :

दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेनंतर येणार्‍या शुक्रवारी बागेचा सण साजरा करण्याची प्रथा पद्मशाली समाजात आहे. यंदाही प्रथेनुसारच शुक्रवार दि 15 जुलै 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पंच कमेटी पद्मशाली ज्ञाती समाजाचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी यांनी दिली.

      यादिवशी शितळा देवी (पोशम्मा तल्ली ) आणि लक्ष्मीमाता (लचमम्मा तल्ली ) यांची यथासांग पूजा -अर्चना केली जाते तथा लक्ष्मी मातेची जत्रा असते. या सणाचे वैशिष्टे म्हणजे शितळादेवी (पोचम्मा) व लक्ष्मीआई (लचयम्मा) या देवींना नैवेद्य दाखवणे. हा नैैवेद्य दाखवण्यामागे प्रमुख उद्देश असे आषाढ महिण्यात रोगराईचा वेगाने फैलाव होतो ही रोगराई थांबवून आम्हा सर्वांना चांगले आरोग्य प्रदान कर अशा प्रकारचे साकडे देवीला घालण्याची पारंपारीक प्रथा आहे.

     शितळादेवीच्या नावातच ’शित’पणा आहे, त्यामुळे या देवीला थंड पदार्थाचे नैवेद्य अर्पित करतात. जसे दही, हळद टाकलेला भात, गोडपुरी, मेथीची भाजी, लिंबाची पाने, फुटाणे, नारळ, ओवा, आणि थंड पाणी इ.

स्त्रिया आपल्या डोक्यावर थंड पाण्याचा कलश घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढतात. या कलशात लिंबाच्या पानाच्या डहाळ्या असतात. ही मिरवणूक गावाबाहेर असलेल्या पोचम्मा व लचमम्मा देवीच्या मंदिरापर्यंत जाते. या कलशाची स्थापना देव्हार्‍यामध्ये केली जाते, त्या नंतर नेवैद्य अर्पण केला जातो व सण साजरा केला जातो.

     समाज बांधवांना आणि सर्वांनाच बागुला पंडुगाच्या हार्दिक शुभेच्छा संजय वल्लाकट्टी यांनी दिल्या.