श्रीनाथ विद्या मंदिरच्या आषाढी दिंडीने परिसर भक्तीमय

  अहमदनगर (दि ९ जुलै २०२२) – प्रत्येक विठ्ठलभक्तांच्या मनात पंढरपुरच्या वारीचे एक विशिष्ट स्थान असते. मोठ्यांचे अनुकरण लहान मुले लगेच करण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक सण, उत्सवाचे महत्व बालवयातच विद्यार्थ्यांना करुन दिल्यामुळे आषाढी-दिंडीतील या बालचमुंच्या सहभागामुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन होते, असे प्रतिपादन रामेश्वर आव्हाड यांनी केले.

     वसंत टेकडी येथील श्रीनाथ विद्या मंदिरच्या बालचमुंनी खांद्यावर भगवे झेंडे, विठ्ठल-रुख्मिणीची पालखी घेत. कपाळी बुक्का, डोक्यावर टोपी आणि ज्ञानोबा-माऊली तुकाराम असा गजर करीत आषाढी दिंडी काढली. यावेळी पालखीचे पूजन सौ.मनिषा व श्री.रामेश्वर आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ.अनिता सिद्दम, एम.एन.येन्नम, ए.जी.चक्राल, एस.एस.शिंदे, देवीदास बुधवंत, माध्य.व उच्च माध्य.च्या प्राचार्य भरत बिडवे  आदि उपस्थित होते.

     श्री.रामेश्वर आव्हाड  पुढे म्हणाले, वारकर्‍यांची दिंडी हे भक्तांना आपले कर्तव्य अन् सेवाभाव वाटतो. या दिंड्या पाहून बालचमुंना त्याचे अनुकरण करावसे वाटते. शाळेत शिक्षकांच्या उत्साहामुळे आता बालवारकरी देव-देवतांच्या रुपात सजल्याने या लहानग्यांमध्ये विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखे वाटते.

     यावेळी मुख्याध्यापिका सौ.सिद्दम यांनी शाळेत घडणारे संस्कार व पालकांची शिदोरी यामुळे लहान वयातच सणांचे महत्व समजते. यामुळे गणपती उत्सव, दहिहंडी, आषाडी दिंडीमध्ये बालक रमून जातात. त्यांच्या निरागस चेहर्‍यावरील रुप पाहून मनाला वेगळाच आनंद मिळतो.

     या आषाढी दिंडीचे वसंत टेकडी परिसरातून नागरिकांनी स्वागत केले. पालखीचे दर्शन घेतले.  या दिंडीची सांगता शिवनगर येथील सिद्धेश्वर मंदिरात झाली. मंदिर समितीच्यावतीने बाळासाहेब आंधळे, सुभाष दहिफळे, बबन नांगरे, विश्वनाथ कुताळ, सौ.मंगल अंबिलवादे, सौ.सुनिता पोळ, सौ.आशा शिरसाठ आदिंनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. या सर्वांचे विद्यालयाच्यावतीने देवीदास बुधवंत यांनी आभार मानले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले