अहमदनगर (दि २८ जून २०२१) : शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपातील भाजपाची मदत झाली. यासाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले व शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभले होते. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे ही विकास कामे मार्गी लागली. विकास कामांमध्ये राजकीय जोडे बाजूला ठेवून शहर विकासाचे प्रश्न मार्गी लावले. आमदार संग्राम जगताप व माझ्यात विकास कामासाठी नेहमी संपर्क होत असतो. शहरामध्ये केंद्र सरकारचे विविध विकास कामाचे प्रकल्प सुरू आहेत. विकासाचे सहमतीचे राजकारण केल्यामुळे हे शक्य झाले आहे. सर्व पक्ष एकत्र राहिल्यास अहमदनगर विकासाला चालना मिळाले असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले 

महापालिकेतील भाजप सत्तेच्या अडीचवर्षेतील विकास कामाचा आढावा व महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मलमताई ढोले यांचा यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल सत्कार करताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप, समवेत खासदार सुजय विखे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की अहमदनगर शहरात पूर्वी विकास कामे मंजूर झाली की त्या कामांमध्ये आडकाठी आणण्याचे काम केले जात होते. त्यामुळे शासनाचा मंजूर निधी परत जात होता. त्यामुळे शहर विकासाला खीळ बसली होती. शहर विकासासाठी अधिकारी वर्ग पुढे येत नव्हता. निवडणुकी पुरते राजकारण ठेवले पाहिजे. निवडणुका संपल्या की सर्व पक्षांनी  एकत्र येऊन शहर विकासाचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात शहरातील विविध प्रश्न मार्गी लागले आहे. अहमदनगर शहरातील पाणी कचरा लाईटचे प्रश्न मार्गी लागले आहे. यानंतर नगरसेवकांना इतर विकासाच्या कामाकडे लक्ष देता येईल नगरकरांना आता राजकारण नको आहे. तर त्यांना विकास हवा आहे.

  अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड गावठाण भागातील सर्व डिपी रस्त्यांचा काँक्रिटीकरण यांचा विकास आराखडा तयार केला असून राज्य सरकारचे परवानगी घेऊन केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठवू. जिल्ह्यामध्ये कोरोणाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये नगर शहरातील महापालिका यंत्रणेने सक्षम पणे काम केले व कोरोनाची जबाबदारी पार पाडली तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेची तयारी पूर्ण झाले असून तीसरी लाट आल्यानंतर आम्ही सक्षम पणे परतून लावू असे ते म्हणाले 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले. व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. खासदार सुजय विखे पाटील यांनी झालेल्या विकास कामाचे प्रेझेंटेशन केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, अनिल शिंदे, सुनील रामदासी, मनोज कोतकर, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, मनोज दुल्लम, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, संभाजी कदम, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनित पाऊलबुधे, सचिन जाधव, कुमार सिंह वाकळे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, गणेश नन्नवरे, अजय चितळे, सतीश शिंदे, संजय ढणे, अजय ढोणे, धनंजय जाधव, विवेक नाईक, गोविंद वाघ, रामदास आंधळे आदी उपस्थित होते.