अहमदनगर (प्रतिनिधी) – मुकुंदनगर येथील सीआयव्ही सोसायटी येथे आसिफ सुलतान फ्रेंड सर्कल व अहमदनगर जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीचा थरार रंगला होता. या स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद लाभून जिल्ह्यातील 32 संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक समद खान, सी.आय.व्ही. कॉलनीचे चेअरमन आरिफ सय्यद, नगरसेवक आसिफ सुलतान, जितू रोहोकले, चंद्रकांत पाटील, मोहसिन कुरेशी, मुस्ताक सर, अन्वर शेख, करीम शेख, अफजल सय्यद, विजू कडू, शिव नारायण, निखिल घोरपडे, साई लोखंडे, बाळासाहेब थोरात, शिवाजी देशमुख, सचिन डोंगरे, बडे मेजर, लोखंडे दादा, बशीर शेख आदींसह खेळाडू व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीकरण्यासाठी स्पर्धा आयोजन समितीचे वाजिद सय्यद, रहमत हानुरे, अक्रम खान, बासिद सय्यद, आवेज शेख, नोमान शेख, ईजाम शेख, समीर शेख, विकार जहागीरदार,कमर जहागीरदार, डॉ.साजिद सय्यद, रजा शेख आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी आलेल्या संघांची जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.