
अहमदनगर: हिवरेबाजार पाठोपाठ राळेगणसिद्धीमध्येही बंड फसले. ग्रामविकास पॅनलच्या ताब्यात सत्ता, बिनविरोधला विरोध करीत नव्याने स्थापन झालेल्या शाम बाबा पॅनलचा पराभव
आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांची पुन्हा एकहाती सत्ता. सर्व जागा जिंकल्या. पोपटराव पवार यांच्या विरोधी उमेदवाराला ४४ मते. पवार २८२ मते घेऊन विजयी.पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्वजण विजयी झाले आहेत.पोपटराव पवार म्हणाले, ‘तीस वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत ग्रामस्थांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. हिरवे बाजारकडे आम्ही फक्त एक गाव म्हणून पाहत नाही. या गावाने अनेकांना योग्य मार्ग दाखवला आहे. ज्या हातांनी हे गाव उभं केलं आहे. ते हात हे गाव चालवण्यासाठी सक्षम असल्याचंही ते म्हणाले.
नेवासा तालुक्यातील सोनई ग्रामपंचायतीत १३ जागा जिंकत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व कायम. विरोधी माजी खासदार तुकाराम गडाख यांना अवघी एक जागा
संगमनेर तालुक्यालीत कणकवली ग्रामपंचायतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना धक्का, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांची बाजी
राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या समर्थकांचे वर्चस्व. भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना धक्का
जामखेड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी. भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर; राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी सहा ११ जागा जिंकत भाजपकडून खेचली सत्ता
माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का. त्यांच्या शेजारच्या लोणी खुर्द गावात विखेंच्या पॅनलचा पराभव. १७ पैकी १३ जागा जिंकत विरोधकांनी केली मात. विखे यांच्या लोणी बुद्रुक गावातील निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे.

बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचे ग्रामविकास पॅनल जिंकले १५ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या नंतर ७ जागांसाठी येथे निवडणूक झाल्या होत्या यामध्ये सर्वच्या सर्व जागा कर्डिलेंच्या ग्राम विकास पॅनल ने जिंकल्या.

