ट्रेजडी किंग,अभिनय सम्राट,बॉलीवुड सुपरस्टार दिलीप कुमार अनंतात विलीन झाले. 1944 साली ज्वार भाटा चित्रपटातुन सिनेसृष्टीत पदार्पण करणार्‍या दिलीप कुमार यांनी जवळ-जवळ 5 दशके आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले. आणि बॉलीवुड मध्ये ट्रेजडी कींग म्हणून अजरामर झाले.दिलीप कुमार यांचे शेकडो चित्रपट बॉक्स ऑफीसचे रेकॉर्ड मोडीत काढणारे ठरले.त्यांचे प्रत्येक चित्रपटातील केलेले अभिनय आजही तितकेच भावणारे आणि त्यांच्या नंतर आलेल्या कित्येक कलाकारांना खुप काही शिकविणारे असे होते.आपल्या बोलण्याच्या विशेष शैलीतुन,कधी आपल्या हसर्‍या चेहर्‍याने सुहाना सफर और ये मौसम हसी, हमे डर है हम खो ना जाए कही म्हणत तर कधी नैन लड जई है तो मनवा मा कसक होई बे करी म्हणत एका गावा कडच्या तरुणाचा रोल म्हणा की राम और श्याम मधील डबल रोल म्हणा,नया दौर सारख्या चित्रपटातुन अत्यंत उतकृष्ट अभिनय आणि दिलीप कुमार यांचा सर्वाधिक लोकप्रिय मोगलेआजम ज्यामध्ये अकबर बादशाहच्या रोलमध्ये आपल्या संवादाच्या विशेष शैलीने प्रसीद्ध असे सुपरस्टार पृथ्वीराज कपुर आणि त्यांच्या पुत्राच्या भुमिकेत (सलीम) दिलीप कुमार दोघांचे अभिनय आणि या चित्रपटातील गाणी,मधुबाला यांचे अभिनय या चित्रपटासाठी उभारण्यात आलेला त्याकाळातील सर्वात भव्य दिव्य सेट की ज्याला शुटींग संपल्यानंतरही देशभरातुन चाहते खास पहाण्यासाठी येत होते.सुपरस्टार मनोज कुमार सोबत क्रांती या चित्रपटातील दिलीप कुमार यांचा अभिनय देश आणि स्वातंत्र्यासाठी त्यांंनी साकारलेली भुमीका आजही तितकीच बोलकी आहे.

चित्रपट क्षेत्रातील श्रेष्ठ असा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना आठ वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी प्राप्त झाला.एक सुंदर-देखणा तरुण चित्रपट क्षेत्रात पदार्पण करतांना कोणालाही वाटले नव्हते की हा दिलीप कुमार जागतीक स्तरावर आपल्या अभिनयाने सुप्रसिद्ध झाला आणि सुपरस्टार बनला.त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांची यादी आहे त्यातील काही निवडक नावे जी अभिनय सम्राट त्यांना का म्हटले गेले किंवा ट्रेजडी किंग ही उपाधी त्यांना का मिळाली हे कळण्यासाठी पुढील काही सिनेमे आपण बघितलेच पाहिजे ज्यांनी पाहिले असेल त्यांना तर माहित आहे. मोगले-आजम,नया-दौर,राम और श्याम,मशाल, क्रांती,कर्मा, सौदागर चित्रपटात दोन सुपरस्टार म्हणजेच राजकुमार आणि दिलीपकुमार यांच्या अभिनय आणि संवादशैलीने चाहत्यांची मने जिंकली. टे्रजडी किंग दिलीप कुमार आणि महानायक अमिताभ यांचा हा सिनेमाही तितकाच आठवणीत राहणारा आणि कर्मा बद्दल तर विचारु नये हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जां भी देगे ए वतन तेरे लिए म्हणत आजही त्यांचा हा गीत प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ऐकण्यास मिळतोच. या आणि अशा अनेक चित्रपटांना दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केले.दिलीप कुमार यांना 1994 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

जेव्हा ट्रेजडी किंग सुपरस्टार दिलीप कुमार अहमदनगरला आले होते तेव्हा….

मलाही या अभिनय सम्राट म्हणजेच दिलीप कुमार यांना भेटण्याची संधी मिळाली तेही आपल्या अहमदनगर शहरातच जेव्हा सरोष टॉकीज हा सिनेमा हॉल स्व.लालु मध्यान यांनी 1986 साली त्याला दिपाली टॉकीज या नावाने पुन्हा सुरु केले. त्यावेळी या दिपाली टॉकीजच्या उद्घाटनासाठी सुपरस्टार दिलीप कुमार आणि त्यांंच्या पत्नी सायरा बानो हे दोघेही अहमदनगरला आले होते.त्यावेळी अहमदनगरकरांनी तुफान गर्दी केली होती.आणि मला आजही आठवत मी माझा दर्शक नुकताच सुरु के ला होता आणि दर्शकचा अंक घेऊन मी टे्रजडी किंग दिलीप कुमार यांना भेटण्यास गेलो.अहमदनगर क्लबमध्ये त्यांच्यासाठी विशेष अशी व्यवस्था त्यावेळी करण्यात आली होती.जेव्हा पडद्यावरील एक मोठा अभिनय सम्राट आपल्या समक्ष बघण्याची ती संधी मला मिळाली त्यावेळेस त्यांना बघुनच मी काही वेळ त्यांना पहातच राहिलो आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले बरखुरदार आप पत्रकार है और हम कलाकार है आणि सायरा बानो यांनी त्यांना सांगितले की माझा मराठी साप्ताहिक आहे तेव्हा दिलीप कुमार म्हणाले की साहब आपने तो हमे अपना एक किया हुआ पत्रकार का किरदार याद दिला दिया.हमे मराठी पढना तो नही आती हां लेकीन समझ लेते है आजही त्यांच्या या आठवणी माझ्या मनात घर करुन आहेत आणि त्यांच्या बोलण्याची पद्धतही अत्यंत उत्कृष्ट होती आणि जेव्हा त्यांच्या सोबत फोटो काढतांना त्यांनी दिलेला तोच एक ट्रेजडी लुक मी तर त्यांना पहातच राहिलो. दिलीप कुमार वयाच्या 98 व्या वर्षी पैगंबरवासी झाले परंतु त्यांच्या चाहत्यांच्या मनांतुन त्यांच्या अनेक चित्रपटातुन ते नेहमीच आपल्या सर्वांच्या आठवणीत राहतील.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह अनेक दिग्गज नेते आणि बॉलीवुड स्टार अंतीम दर्शनासाठी उपस्थित होते.पद्मविभुषण दिलीप कुमार यांना शासकीय इतमामात दफन भुमीत सुपुर्द ए खाक करण्यात आले.

Video Courtesy Akram Ramay Youtube