
अहमदनगर :भारत सरकारच्या एमएसएमई ही लघु उद्योजकांच्या विकासासाठी असलेली आपल्या देशातील सर्वोच्च संस्था असून, या संस्थेच्या अंतर्गत विविध औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी धोरणे व विविध योजना राज्य व केंद्र मंत्रालयाद्वारे तयार केल्या जातात. या मंत्रालयाच्यावतीने लघु उद्योजकांच्या उद्योगांसाठी त्यांच्या विकासासाठी अनेक योजना आहेत, ज्यामध्ये उद्योजकता विकास, तंत्रज्ञान विकास, विपणन समर्थन, नवनवीन शोधकार्य व क्लस्टर डेव्हलपमेंट याचा समावेश असल्याची माहिती एमएसएमईचे डायरेक्टर पी. एम. पार्लेवार यांनी नगरला पत्रकार परिषदेत दिली.करशेटजी रोडवरील नगरमधील अद्यावत अशा गोल्ड ज्वेलर्स कौन्सिल, गोल्ड ज्वेलरी क्लस्टरला सदिच्छा भेट दिली असता पत्रकारांना माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र औद्योगिक क्लस्टर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, सोमनाथ गौर, धर्मेद्र सिसोदिया, गणेश सुपेकर, कैलास मुंडलिक, ईश्वर बोरा आदि याप्रसंगी उपस्थित होते.
पी. एम. पार्लेकर म्हणाले, राज्यात सध्या विविध उद्योगांचे 27 क्लस्टर कार्यान्वित असून, या एमएसएमई या योजनेअंतर्गत मंत्रालयातर्फे संभाव्य व विद्यमान उद्योगांना मार्गदर्शन करुन मदत केली जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व अधिपत्याखाली या योजनेअंतर्गत उद्योजकांचा मोठ्या प्रमाणावर विकास साधण्याचे कार्य सध्या राज्यात सुरु आहे व त्याला यश देखील मिळत आहे.अहमदनगरमधील गोल्ड क्लस्टर हे महाराष्ट्रातील एकमेव ज्वेलरी क्लस्टर असून, त्याच धर्तीवर नागपूरमध्ये एमएसएमई या योजनेअंतर्गत एक भव्य असे सामुहिक सुविधा केंद्र राजेश रोकडे, अखिल भारतीय जेम्स व ज्वेलरी डोमॅस्टीक कौन्सिलचे पदाधिकारी यांच्यासोबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्याचे काम सुरु असून, यासाठी या कौन्सिलचे पदाधिकारी नगरच्या गोल्ड क्लस्टरला भेट देण्यासाठी आले होते.
येथील कामकाजाची पाहणी केलेल्यानंतर याच धर्तीवर सुमारे 20 करोड रुपये खर्चुन कौन्सिल ज्वेलर्स करिता एक सामुहिक केंद्र नागपुरला उभारले जात असून, सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर एमएसएमई अंतर्गत लघु उद्योजकांकरिता भरपुर संधी उपलब्ध झाल्या असून, अशा परिस्थितीत उद्योजकांनी पुढाकार घ्यावा व या मंत्रालयाच्यावतीने कार्यान्वित केलेल्या योजनाचा आपल्या उद्योगाच्या भरभराटीसाठी उपयोग करावा, असे आवाहन पार्लेवार यांनी केले. पी.एम.पार्लेवार यांनी नगरच्या गोल्ड ज्वेलरी क्लस्टरची पाहणी करुन तेथील कामकाजाबद्दल मोठे समाधान व्यक्त केले. पत्रकार परिषदेनंतर या ठिकाणी सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी केली.
