पारनेर (प्रतिनिधी) –  कोरोना रूग्णांसाठी केलेल्या कामगिरीबददल  मिळालेला लंडन येथील वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार आपण मतदारसंघातील विधवा, परित्यक्त्या, अपंग, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आरोग्य मंदीरात काम करणारे  कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, नीलेश लंके प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील जनतेला समर्पीत करीत असल्याची प्रतिक्रिया आमदार नीलेश लंके यांनी गुरूवारी मुुंबईत पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली. 

पुरस्कार प्रदान केल्यानंतर आ. लंके म्हणाले, कोरोना संकट उभे राहिल्यानंतर पहिल्या लाटेमध्ये अडीच लाख वाटसरूंना भोजणाची व्यवस्था करण्यात आली. अनवानी चालणाऱ्या वाटसरूंना चपलांचे वितरण करण्यात आले. लॉकडाउन शिथील करण्यात आल्यानंतर परराज्यात, परजिल्हयात जाणाऱ्या नागरीकांसाठी निवाऱ्याची, भोजनाची तसेच त्यांच्या गावांना जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतरच्या काळात कर्जुलेहर्या येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर सुरू करण्यात येऊन साडेपाच हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

विशेष म्हणजे रूग्णांना आधार देण्यात आल्याने एकाही रूग्णाचा आरोग्य मंदीरात मृत्यू झाला नाही. माजय हातून समाजासाठी हे चांगले काम झाले त्याची दखल लंडनच्या संस्थेने घेतल्याने या कामासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे, तेथे सेवा  देणाऱ्या डॉक्टरांचे चिज झाले असेच म्हणावे लागेल हा पुरस्कार आपण मतदारसंघातील जनतेला समर्पीत करीत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

यावेळी बाबाजी तरटे, अ‍ॅड. राहूल झावरे, डॉ. संतोष भुजबळ, बाळासाहेब खिलारी, मुकूंदा शिंदे, सत्यम निमसे, अमोल उगले, नितीन चिकणे, गोकुळ शिंदे, दादाभाउ रेेपाळे, भाउसाहेब डुकरे, बाजीराव कारखिले, दत्तात्रेय साळूंके, रोहिदास डेरेंगे, किरण म्हस्के, बाळासाहेब औटी, भाउसाहेब आहेर, संतोष नवले आदी यावेळी उपस्थित होते. 

अजित पवारांनीही केले कौतुक 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आ. लंके यांनी भेट घेतल्यानंतर कोरोना काळात मिळालेल्या पुरस्काराबददल आनंद व्यक्त केला. आ. लंके यांनी कोरोना रूग्णांची सेवा करताना दिशादर्शक काम केले. त्याची लंडनच्या संस्थेने दखल घेउन सन्मान केल्याबददल पवार यांनी आ. लंके यांचे कौतुक केले.