अहमदनगर (प्रतिनिधी ) : चोर्‍या, घरफोडीचे प्रकरणांना आळा बसावा गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये पुन्हा डीबी म्हणजे तोफ खाना तपास पथक कार्यान्वित करण्यात आली आहे. डीबी मध्ये तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज मेढे, सय्यद शकील लतीफ, अविनाश वाकचौरे, वसीम रशिद पठाण, अहमद परवेज इनामदार, शैलेश उत्तमराव गोमसाळे, सचिन उत्तम जगताप, अनिकेत आंधळे, यांचा समावेश आहे.

तोफखाना पोलीस ठाणे मध्ये अगोदर डीबी ही कार्यरत होती, मात्र काही प्रमाणामध्ये अंतर्गत घडामोडी झाल्यामुळे डीबी ही रद्द करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरन देण्यात आले होते, त्यानंतर तोफखाना पोलिसांनी डीबी बरखास्त केलेली होती, नव्याने डीबी नियुक्त करण्याचे निर्णय सुद्धा झाला होता,

त्या अनुषंगाने येथील तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तात्पुरता स्वरूपामध्ये डीबी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार ती डीबी नियुक्त करण्यात आलेली आहे, दरम्यान सावेडी उपनगरांमध्ये वाढती गुन्हेगारी याला आळा बसावा तसेच अवैध धंद्यांना चाप बसावा हा त्यामागचा उद्देश आहे.