अहमदनगर (पारनेर) दि १४ जुन २०२१ : पर्यावरण आणि जलसंधारण यामध्ये उल्लेखनीय काम असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा १५ जून रोजी ८४ वा वाढदिवस पर्यावरण पूरक उपक्रम राबवून राळेगणसिद्धी परिवाराच्यावतीने साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी परिवाराच्यावतीने ‘व्हर्च्युअल सायकल रॅली’चे आयोजन केले जाणार असून “इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा” असे संदेश देणारी पर्यावरणपूरक मोहीम हाती घेणार असल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी दिली.

दिवसेंदिवस वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे “ग्लोबल वार्मिंग”चे परिणाम जगावर जाणवू लागल्याने पर्यावरणाची जागृती व संवर्धन करण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. दरवर्षी अनेक सामाजिक, शैक्षणिक, जलसंधारण तसेच पर्यावरणपुरक उपक्रमांनी हजारे यांचा वाढदिवस साजरा केला जात असतो.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य हे उत्तुंग आहे. येत्या १५ जूनला त्यांचा ८४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण आपल्या राहत्या ठिकाणी उपस्थित राहून सायकल चालवून त्यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या वाढदिवसाची अनोखी भेट देण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी केले आहे. सायकल रॅलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांना  प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

रॅलीत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आपण फॉर्म भरावा.

https://docs.google.com/forms/d/1cupqzpQa1HhVk-waVn1yTEoDEdJxH5IGj4ZqD6bD_38/edit?usp=sharing

आपण नोंदणी केल्यावर खालील whatsapp ग्रुपच्या लिंक वर ग्रुपमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राळेगण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर ७४४८०७९२६ या क्रमांकाशी संपर्क साधावा.

https://chat.whatsapp.com/JKyFhM4O1wZB56KJYMr7bu…

रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन 

कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे अण्णांच्या वाढदिवसानिमित्त कोणीही गर्दी करू नये. सायकल रॅलीतच सहभागी होऊन अण्णांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

– डॉ. धनंजय पोटे, सरपंच राळेगणसिद्धी