
मुंबई: कोरोना महामारीची सुरवात त्यात पहिली लाट त्यानंतर दुसरी लाट आणि लॉक डाउन आणि चर्चा सुरु झाली ती तिसऱ्या लाटेची भयंकर रूप धारण केलेल्या या कोरोना व्हायरसने या दुसऱ्या लाटेत अनेक बळी घेतले आणि आपल्यातुन अनेक नातेवाईक,मित्र सहकारी सगेसोयरे आणि जोडीदारांना आपण गमावले कोणत्याही वयाचे अनेक आपले आपण या दुसऱ्या लाटेत गमावले त्यामुळे लागलेले लॉक डाउन काही अंशी अत्यावश्यकच होते असेच म्हणावे लागेल परंतु हातावर पोट असलेल्यांसाठी जास्त काळ बंद असणे हे जीवन जगणे विदारक करणारे ठरते.
आता मात्र हि दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे आणि हळूहळू परिस्थिती आटोक्यात येत आहे त्यामुळे येत्या १ जून नंतर हळूहळू लॉक डाउन उघडणे सुरु होईल अशी माहिती सुत्रामार्फत मिळत आहे फक्त नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून कोविड प्रतिबंधक उपाययोजना नियमित केल्यास आणि लसीकरणावर सर्वांनी भर दिल्यास आपला महाराष्ट्र आणि भारत लवकरच या महामारीतुन बाहेर निघेल.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता सरकार कधी उठवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, यापूर्वीचा अनुभव पाहता ठाकरे सरकार लॉकडाऊन उठवताना कोणतीही घाई होणार नाही, याची विशेष काळजी घेणार आहे. त्यासाठी राज्यातील लॉकडाऊन एका झटक्यात न उठवता चार टप्प्यात त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकार 1 जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.एकदम सर्वच अनलॉक न करता टप्प्या टप्प्याने अनलॉक करण्याचे निर्णय सरकारकडून जाहीर केले जाईल
