संभाजीराजे यांनी शाहु महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतल्यानंतर आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,बहुजन समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठा समाजाच्या नेमक्या अपेक्षा समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठीफोन केल्यांचे संभाजीराजे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना २७ मे किंवा २८ मे रोजी सकाळी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच इतर मोठ्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.मराठा समाजाला नेत्यांनी वेठीस धरू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांनी मार्ग काढावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.संभाजीराजे यांनी कोरोना संकटात जीव महत्त्वाचा असल्याने मराठा समाजाने संयम बाळगावा असे आवाहन केले.महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणेसाठी दबाव टाकणार आहे.