एका दिवशी सकाळी लवकरच ९च्या सुमारास  नल्लामंदू सर घरी आले मी जरा अवाक झालो ; मला वाटले कांही जरुरी काम असेल ; नेहमी प्रमाणे ,चहा पाणी झाले ; लगेच त्यानी मला शाल;श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला पण हे काय म्हणून विचारले ; अहो सर आज १ एप्रिल आहे ; तुमचा वाढदिवस आहे हे मी कसा वीसरेन? ; बहुजन लोक आपणास विसरु शकणार नाहीत मी तर तुमचा मित्र आहे ; आपली वैचारिक मैत्री आहे ; आपण पत्रकार आहोत असे खुप कांही बोलून गेले….

याची आज खुप आठवण येते ; एवढा चांगला मित्र ; संपादक; कार्यकर्ता व शिक्षक असे सर्व गुण संपन्न माणुस आज दुर्मिळ आहे त्यांचे वयाचे ८६व्या वर्षी जरी निधन झाले तरी नेहमी चिरतरूण होते ; आनंदी होते ; नेहमी क्रियाशील होते ; आळस त्याना माहित नव्हत…

ते माझे चांगले मित्र होते कारण मीही साप्ताहिक बंडखोरचा संपादक व तेही साप्ताहिक कासिदचे संपादक; तेही शिक्षक व मी शिक्षक ; ते ही सामाजिक कार्यकर्ते व मी ही सामाजिक कार्यकर्ता ; ते ही संस्था चालक व मी ही संस्था चालक अशी समानता व सख्य असल्याने जिव्हाळा होता ते सोलापूर महानगरपालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षक होते पण फक्त मुस्लिम मुलाना उर्दू शिकविणे बरोबर समाजालाही समाज शिक्षण देण्यासाठी ; प्रबोधन करण्यासाठी “कासिद ” वृत्तपत्र सुरु केले यासाठी ते नोकरी सांभाळून कधी रजा ; कधी सुट्टी दिवशी ते कासिद साठी महाराट्र भर फिरत असत…..

साप्ताहिक कासीदचे संपादक पत्रकार हाजी अब्दुल लतीफ नल्लामंदू अहमदनगरला आमच्या दर्शक भवनला नेहमी भेट द्यायचे अत्यन्त मनमिळाऊ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व कासिद फक्त सोलापूर पुरते नाही तर अहमदनगर, औरंगाबाद, नासिक, मुंबई, कोल्हापूर आणि जवळ जवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहचविले असे आमचे जुने मित्र आज आपल्यात नाही त्यांना "दर्शक" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 
दुआ है की अल्लाह मगफिरत फरमाए उनके दरजात को बुलंद करे आमीन या रब्बुल आलमीन

इतकी सामाजिक तळमळ होती एका शिक्षकांने कोणतेही मोठे भांडवल नसताना ; पोटाला चिमटा घेऊन मोठ्या जिद्दीने पेपर आज ४७ वर्षे अखंड चालू आहे याला तोड नाही आपले बरोबर इतर पत्रकार याना मदत ; मार्गदर्शन करणे व पत्रकार संरक्षण व संघटना बांधणी यासाठी ते नेहमी पुढे असायचे ते मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष होते ग्रामीण पत्रकारांना संघटनेशी जोळून घेतले त्यांना न्याय मिळवून देण्याचा नेहमीच प्रयत्न केले ;

बिहारचा पत्रकार काळा कायदा विरुद्ध आंदोलनामध्ये त्याना शिक्षा झाली होती ती त्यानी मोठ्या आनंदाने भोगली ; पत्रकारांसाठी वाटेल ते करण्यामध्ये पुढाकार असे ; पत्रकारांना बैठका व कार्यक्रमासाठी पत्रकार भवन असावे यासाठी खुप प्रयत्न केले ते यशस्वी करुन पत्रकार भवन उभे करुन दाखविले ते अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषदे चे संस्थापक कोषाध्यक्ष होते ; प्रश्न समाजाचा असो की पत्रकारांचा असो ते नेहमी पुढाकार घेत व यशस्वी करित असत ;

सोलापूर येथे त्यांचे पुढाकारातून मुस्लिम मराठी साहित्य परिषद चे पहिले सम्मेलन घेऊन यशस्वी केले  होते ; आपण जरी मुस्लिम असलो तरी आपण “मराठी ” आहोत ; बोली भाषा मराठी आहे ; या मराठी मातितील साहित्यिक आहोत हे इतर समाजाला जाणीव करुन देण्याची कामगिरी त्यानी करुन दाखविली म्हणजे आपण ज्या ठिकाणी रहातो तेथे एकरुप होऊन गेले पाहिजे ही शिकवण आपले मुस्लिम समाजाला दिली हा केवढा मोठा विचार आहे ते उर्दू शिक्षक होते पण त्यावर ते समाधानी नव्हते आपली स्वत ची उर्दू शिक्षण देणारी संस्था असावी म्हणजे अधिक चांगले उर्दू शिक्षण देण्याचे काम करता येईल म्हणून त्यानी शमा शिक्षण संस्था स्थापन केली आज ती यशस्वीपणे चालू आहे त्यानी अनेक चरित्रात्मक पुस्तके लिहिली आहेत 

मुस्लिमांचे स्वातंत्र्य.लढयातील मुस्लीमांचे योगदान हे आत्यंय मह्त्वाचे पुस्तक आहे ; मुस्लिमेतर समाजाला जाणीव करुन देणारे पुस्तक आहे ही राट्रीय बांधिलकी त्यानी पार पाडली;  “भारतीय राज्यघटना हा बहुजनांचा ताजमहाल आहे ” असा विचार करुन त्यानी लेख लिहुन एका वाक्यात भारतीय घटनेचे मोठेपण व सुंदरता लोकाना समजावून सांगितली.;

जगाला आपल्या सुंदरतेने वेड लावणारा ताजमहाल भारतात आहे अशीच आमची घट्ना जगात मौल्यवान आहे ही भारत रत्न डा बाबासाहेब आंबेडकर यांची देशाला दिलेली समतेच्या विचाराची देणगी आहे.असे त्यानी आपले शब्दात सांगितले आहे

असा हा थोर विचारवंत; शिक्षक ; पत्रकार व समाज सुधारक हाजी अ.लतीफ नल्लमंदू हे आपणास कायमचे सोडून गेले त्याना भावपुर्ण श्रध्दांजली 


जमाना बडे शौक से सुन रहा था । हम ही सो गए दास्तां कहते कहते ॥


लेखक : आंबादास शिंदे पुणे / सोलापूर  मो 9890988014