अहमदनगर- 6 मे 2021 आपल्या यशस्वी उद्योजकतेलाच समाजकार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यातील सातत्य आ. रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो लिमीटेडने कायम राखलेले आहे. याच दृष्टीकोनातून कोरोनाच्या या संकटमय परिस्थितीतही बारामती ऍग्रो लिमीटेडकडून या पायंडा सुरुच आहे. याचाच एक भाग म्हणून आ.रोहित पवारांतर्फे बारामती ऍग्रोच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा आरोग्य व्यवस्थेसाठी ३९ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपकरणे अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आज बुधवारी सुपूर्द करण्यात आली. 

नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आ.रोहित पवार सतत कार्यरत आहेत. मात्र हे प्रय़त्न केवळ आपल्या कर्जत जामखेड मतदार संघापुरतेच मर्यादित न ठेवता जिल्हा स्तरावरही आ. रोहित पवार विविध प्रयत्न करत आहेत. कर्जत जामखेडसह जिल्हातील विविध तालुक्यातील रुग्ण हे उपचारासाठी अहमदनरमधील रुग्णालयातही दाखल होत आहेत.

परिणामी येथील आरोग्य सुविधेवर ताण पडू नये व सद्यपरिस्थितीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या व निर्माण होणारा ऑक्सीजनचा तुटवडा लक्षात घेऊन आ. रोहित पवार यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीतून बारामती ऍग्रोच्या माध्यमातून ३९ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपकरणे अहमदनगर जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द करण्यात आली.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून येथील पोलीस परेड ग्राऊंडवर उभारण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटर येथे ही उपकरणे अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली. 

कोरोनाबाधित रुग्णासाठी सुरुवातीच्या काळात ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ हे उपकरण प्रभावी ठरते. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. एकावेळी पाच लिटर ऑक्सिजन सांभाळण्याची क्षमता असल्याने याचा चांगला लाभ गरज असलेल्या कोरोना रुग्णांना होणार आहे. यावेळी आ. रोहित पवार यांच्यासह आ. संग्राम भैय्या जगताप, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुनील पोखरणा, महानरपालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त शंकर डांगे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कपील पवार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह इतर अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येक संकटात बारामती ऍग्रो मदतीसाठी तत्पर..

राज्यासह देशावर जेव्हा जेव्हा आपत्ती आली त्या त्या वेळेस एक सामाजिक दातृत्वाची जबाबदारी समजून विविध मदतींद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्यास आ. रोहित पवार यांची बारामती ऍग्रो लिमीटेड कटीबध्द राहिलेली आहे. प्रत्येक संकटाच्या काळात बारामती ऍग्रो लिमीटेडने सहकार्याची भूमिका बजावलेली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, कन्नड, नारायणपूर या शासकीय रूग्णालयांसह पुण्यातील ससून रुग्णालयाला वेळवेळी सिरींज पंप, बेबी वॉर्मर, रुग्णवाहिका, सक्शन मशीन, व्हिल चेअर, वॉटर कुलर यासारखी वैद्यकीय मदत केली आहे. 

मागच्या काही वर्षातील दुष्काळात मराठवाड्यासह इतर दुष्काळी भागातील तालुक्यांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा केला आणि चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच सांगली व कोल्हापूर महापूराच्या वेळेस शालेय विर्थ्यांसाठी शाळेची दप्तरे तर पूरग्रस्तांसाठी अन्नधान्यासह वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. 

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कवच म्हणून जिल्हा प्रशासन,आरोग्य यंत्रणा, यासह सर्व फ्रंटलाईन वर्कसना सॅनिटायझरसह, इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या. तर याच कोरोना काळात पंढरपूर येथे झालेल्या अतिवृष्टीत पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंसह कोरोनाच्या बचावासाठी सेफ्टी किट पुरवण्यात आले. 

उत्तराखंड येथे २०१३ मध्ये ढगफुटी झाल्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत कपडे व घरगुती जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. तसेच पुण्याच्या शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट वसाहतीला लागलेल्या आगीच्या वेळेस तेथील बाधित नागरिकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. प्रत्येक संकटात आ. रोहित पवार यांची बारामती ऍग्रो आधारासाठी कायम पुढे सरसावली आहे. 

संकट कोणतंही असो, प्रत्येक संकटात आपल्या माणसांचा आधार होणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. बारामती ऍग्रोच्या माध्यमातून ही सामाजिक बांधिलकी कायम जपली जात असून याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या या सकंटमय परिस्थितीत ३९ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर अहमदनगर जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द करण्यात आली.