शासनाचा सलून बंदचा आदेश अमान्य करत सलुन व्यावसायिक संतोष गायकवाड याने दिला होता आत्मबलिदानाचा इशारा

अहमदनगर : भिंगार गवळीवाडा येथील सलुन व्यावसायिक संतोष गायकवाड याने शासनाचा सलून बंदचा आदेश अमान्य करत आत्म बलिदानाचा इशारा काल सोमवारी दि, ५ रोजी दिला होता मात्र त्यांनी हा निर्णय मागे घेत परिस्थिती मान्य करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाला दिल्याने श्री गायकवाड याच्यावरची कारवाईही टळली आहे .या संदर्भातील माहिती समजताच ओबीसी व्हिजे एटी जनमोर्चाचे शहरजिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,राजेद्र पडोळे व राजेश सटाणकर यांनी भिंगारला जावुन श्री गायकवाड यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली जनमोर्चाचा माध्यामातुन हा विषय आणि सलुन कारागीराचा प्रश्न शासनाच्या दरबारी माडंला जाणार असुन तसे आश्वासन जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी श्री गायकवाड यांना दुरध्नानी वरुन दिले.परिस्थितीची कल्पना श्री भुजबळ यांनी श्री.सानप यांना दिली.राज्य सरकारला निवेदन देण्यांचे यावेळी श्री. सानप यांनी सुचविले त्याप्रमाणे मुख्यमंत्री ,पालकमंत्री आणि संबधिकांना निवेदन पाठविण्यात आले आहे .यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे अशोक जाधव ,भैरुप्पा मेजर उपस्थित होते