मुंबई । भारताचा लोकप्रिय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला रुग्णालयात दाखल झाला आहे. २७ मार्चला आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिल्यानंतर पुढील काही दिवस सचिन होम क्वारंटाइन होता. मात्र, आता कोरोनावरील उपचारांसाठीच सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार आपण रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती स्वतः सचिन तेंडुलकर यानेच ट्विट करत दिली आहे.

सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या तब्बेतेसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा’, असे आवाहनही सचिनने आपल्या ट्विटमधून केले आहे.