
पुणे – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्याच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आठवड्याला रुग्णांची वाढ अशीच राहिली तर पुण्यात दररोज 9 हजार नवीन रुग्ण सापडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून पुढील सात दिवसांसाठी काही सेवा पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनी याची माहिती दिली.
काय आहेत निर्बंध
- हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी बंद.
- मॉल्स, सिनेमा हॉल बंद
- धार्मिक मंदिरे बंद
- पीएमपी बसेस 7 दिवसांसाठी बंद
- सध्याकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीत संचारबंदी
- कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
- 30 एप्रिलपर्यंत शाळा कॉलेजेस बंदच
- हॉटेल पार्सल सेवा सुरु राहतील
- अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
- लग्न आणि अंत्यसंस्कारासाठी मर्यादीत लोकांच्या उपस्थितीची अट
