मुंबई : पियाजिओने एसएक्सआर रेंजची स्कूटर एप्रिलिया एसएक्सआर 125 लाँच करण्यापूर्वी शुक्रवारपासून त्यासाठी बुकिंग करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, 5,000 रुपये टोकन अमाऊंट भरुन कंपनीच्या डिलरशिपद्वारे तुम्ही Aprilia SXR 125 ही स्कूटर बुक करु शकता. मागील डिसेंबरमध्ये, इटालियन प्रीमियम स्कूटर उत्पादक कंपनीने देशात एप्रिलिया एसएक्सआर 160 सादर केली होती. पियाजिओ इंडियाचे मुख्य आणि व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्रॅफी म्हणाले की, “आमच्या प्रतिष्ठित ग्राहकांना ही लेटेस्ट स्कूटर Aprilia SXR 125 प्री-बुक करण्याची संधी आहे. Aprilia SXR 125 ही स्कूटर खास भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. ही स्कूटर इटलीमध्ये डिझाईन करण्यात आली आहे. सध्या ही स्कूटर भारतीयांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. आम्ही सध्या ही स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहोत.

किंमत

प्रीमियम स्कूटर एप्रिलिया एसएक्सआर ची शोरूम किंमत 1.26 लाख रुपये अंदाजे इतकी आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 5 हजार रुपयांची टोकन रक्कम भरुन भारत भरात कंपनीशी संलग्न कोणत्याही डीलरशिपद्वारे ही स्कूटर बुक केली जाऊ शकते. याशिवाय कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगचा पर्यायही देण्यात आला आहे.

जबरदस्त इंजिन

कंपनीने म्हटले आहे की, या स्कूटरमध्ये सिंगल-सिलिंडर 4-स्ट्रोक इंजिन आहे, जे 7100 आरपीएमवर 11 पीएसची मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. या स्कूटरची इंधन टाकी क्षमता 7 लिटरची आहे.