अहमदनगर (दि ८ मार्च २०२१) : कोरोनामुळे 2020 हे वर्ष आपण कोणीच विसरु शकत नाही. लॉकडाऊनच्या काळात घराच्या बाहेर व मोकळ्या जागेत फिरणे शक्य नव्हते. प्रत्येकाला आपली प्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक असल्याने मोकळ्या जागेत खेळणे, व्यायाम, फिरणे गरजेचे होते. प्रभाग 2 मधील बहुतांश कॉलनी, उपनगरातील ओपनस्पेस विकसित करण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न केला. लॉकडाऊनमुळे ओपनस्पेसचे महत्व नागरिकांना कळाले, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.शिलाविहार जवळील बहार बँक कॉलनीत ज्येष्ठ व लहान मुलांसाठी उद्यान सुशोभिकरणाचा शुभारंभ अन्वय पागे व जय बिडवे या चिमुकल्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी श्री. वारे बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक विनित पाउलबुद्धे, सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, आकाश त्र्यंबके, सुधाकर देशपांडे, हेमंत बल्लाळ, मच्छिंद्र तुवर, बिभिषण अनभुले, सतीश शहा, प्रसाद रिंगणे, सोहम सौंदणकर, रविंद्र पहिलवान, चंद्रशेखर गटणे, कन्हैय्या मुनोत, एकनाथ चेमटे, सुरेश बिडवे, माऊली गायकवाड, अर्जुन आंधळे, शंकर सिंग, जगदीश केदारी, संभाजी गायकवाड, सुधाकर पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

वारे पुढे म्हणाले, या ओपन स्पेसमध्ये पेव्हींग्ज ब्लॉक, वृक्षारोपण, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळयला, तसेच स्टेज बांधण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या उद्यानात रमतील, लहान मुलांना खेळायला चांगली सोय होईल, असे सांगून आ.संग्राम जगताप यांच्या सहकार्याने येथे हायमास्ट बसविण्यात येणार असल्याचे श्री.वारे म्हणाले.नगरसेवक पाउलबुद्धे म्हणाले, लॉकडाऊनमध्ये पर्यावरणाला महत्व आले होते, त्यादृष्टीने येथे देशी झाडांचे वृक्षारोपण करुन पर्यावरणाला पुरक असे वातावरण तयार होईल. बाळासाहेब पवार म्हणाले, भविष्यात सर्व ओपन स्पेस जेथे जेथे आहेत ती विकसित करण्याचा आमचा चारही नगरसेवकांचा प्रयत्न राहील, असे सांगितले.प्रास्तविकात सतीश बल्लाळ यांनी या ओपन स्पेसचे 30 वर्षांनंतर सुशोभिकरण होते हे केवळ या भागातील चारही नगरसेवकांच्या कामाचे फलित आहे. शेवटी सचिन वारे यांनी सर्वांचे आभार मानले.