अहमदनगर (दि २ मार्च २०२१) : महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुले यांनी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

भाजप नगरसेवकांच्या हातात हात घालून राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुले यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या अगदी विरुद्ध जात पहिल्या प्रमाणेच आजही भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी अहमदनगर महानगर पालिकेत कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतील यारी दोस्ती आणि त्यांचे मनपातील ताळमेळ हे यापूर्वीही सर्वज्ञात आहेतच महापौर भाजपचे असतीलही परंतु जे महाराष्ट्र सरकार स्थापन करते वेळी प्रमुख पक्षांना सत्ता स्थापन करण्यास जमले नाही ते अहमदनगरला यापूर्वीही महापौर करतांनाहि जमले आणि पुढंही राष्ट्रवादी आणि भाजपची हि आघाडी अहमदनगर मनपात अशीच कायम राहील असे सूत्रांच्या माहितीवरून आम्हाला कळालं आहे.अर्ज दाखल करतांना बसपाचे मुदस्सर शेख आणि सचिन जाधव हे सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि भाजप-काँग्रेस,बसपा-राष्ट्रवादीच्या संगनमताने आजचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.