अहमदनगर :  राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरभी हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबिरात एक हजारपेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली, तसेच सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

  या शिबिरांतर्गत रुग्णांना कॅन्सर, प्लास्टिक सर्जरी, वंध्यत्व निवारण, दमा, मधुमेह, हृदयरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, मुळव्याध, भगंदर, बालआरोग्य, लिव्हर व पोटविकार आदी आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकूण 1 हजार 81 रुग्णांची मोफत तपासणी केली. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे व इतर तपासण्या आवश्यक आहेत, अशा रुग्णांना अतिशय सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया व इतर उपचार करण्यात आले.

    शिबिर यशस्वीतेसाठी सुरभी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. राकेश गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी, डॉ. अमित पवार, डॉ. गणेश जंगले, डॉ. सुनील आवारे, डॉ. प्रियन जुनागडे, डॉ. विलास व्यवहारे, डॉ. रोहित फुलवर, डॉ. तुषार मुळे, डॉ. वैभव अजमेरे, डॉ. श्रीतेज जेजूरकर, डॉ. अमित भराडिया, डॉ. इब्राहीम पटेल, डॉ. अजित ठोकळ, डॉ. अमित पवळे, डॉ. दीपक जाधव, डॉ. प्रितेश कटारिया, डॉ. नितीन फंड, डॉ. संकेत सारडा, डॉ. भूषण लोहकरे, डॉ. चंद्रशेखर जंगम, डॉ. स्वाती जेजूरकर, डॉ. राजश्री आवारे, डॉ. वर्षा जंगले, डॉ. निशांत त्रिपाठी, डॉ. मंदार शेवगावकर यांच्यासह सर्व डॉक्टर संचालक अधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.