राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय विमान प्रवास भाग दोन शुक्रवारी सुरू झाला. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणासाठी वर्षा बंगल्यापासून जवळच असलेल्या राजभवनातील हेलिपॅड न वापरता रेसकोर्सवरील हेलिपॅडवरून उड्डाण केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जव्हारच्या दौऱ्यावर आहेत.मसुरी येथे आयएएस अधिकाऱ्यांच्या सत्कारासाठी जात असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमान प्रवासास महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे सरकारी विमानात बसलेल्या कोश्यारी यांना उतरावे लागले. त्यानंतर राजभवनातील अधिकाऱ्यांनी धावपळ करून खासगी विमानाची सोय केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी हे डेहराडून विमानतळाकडे रवाना झाले.शुक्रवारी पालघरमधील जव्हार दौऱ्यावर आहेत. एरवी वर्षा निवासस्थानापासून जवळ असलेल्या राजभवनातील हेलिपॅडवरून मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेते. मात्र, काल कोश्यारी यांना विमानप्रवास नाकारल्यानंतर राजभवन आणि सरकार असा उघड संघर्ष सुरू झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला राजभवनातील अधिकारी थेट विरोध करू शकतात असे गृहीत धरून सामान्य प्रशासन विभागाने राजभवनाऐवजी रेसकोर्सवरील हेलिपॅडवरून उड्डाण करण्याच्या निर्णय घेतला.