नवी दिल्ली, :  अमेरिकेची तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ऍपल आता चीनला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. ऍपल कंपनी आता आयफोन, आयपॅड, मॅक आणि इतर वस्तूंच चीनमधील उत्पादन केंद्र इतरत्र हालवणार आहे. ऍपल कंपनी आता लवकरच आपल्या पहिल्या 5G स्मार्टफोन आणि आयफोन 12 (iPhone 12) सीरीजच्या उत्पादनाला भारतात सुरू करणार आहे.ऍपल कंपनीच्या आयपॅडचं उत्पादन व्हिएतनाममध्ये होणार आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत हे उत्पादन सुरू होणार आहे. ऍपल कंपनी पहिल्यांदाच चीनबाहेर एवढ्या मोठ्या संख्येनं उत्पादन तयार करणार आहे.ऍपल कंपनी भारतातही आयफोनचं उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयफोन12 च्या सीरीजचं उत्पादन याच तिमाहीत सुरू केलं जाणार आहे. ऍपल कंपनीचे फोन तयार करण्याचं सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं उत्पादन केंद्र भारत आहे.