रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींना बालाकोट येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती आधीपासूनच होती. इतक्या संवेदनशील गोष्टी त्यांना माहिती कशा झाल्या असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.अनिल देशमुख पत्रकारांशी बोलत होते. याप्रकऱणी मंत्रीमंडळाची बैठक होत असून यासंदर्भात काय कारवाई करायची,याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांचे व्हायरल झालेल्या व्हॉट्सऍप चॅटची संपूर्ण माहिती आम्ही घेतलेली आहे, असेही ते म्हणाले.यापू्र्वी अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यामधील संवाद चर्चच्या तपासासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केलेली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रीय सुरेक्षेच्या संबंधित मुद्द्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार म्हणाले होते.