आगामी 15 जानेवारीपासून Vodafone Idea (Vi) दिल्लीमध्ये 3G सेवा बंद करणार आहे. कंपनीकडून आपल्या 3जी सिम युजर्सना मेसेज आणि कॉलद्वारे 15 जानेवारी पर्यंत 3जी सिमकार्ड 4G मध्ये पोर्ट करण्यास सांगितलं जात आहे.

कस्टमर केअर सेंटरमध्ये जाऊन 4 जी मध्ये करा पोर्ट

व्होडाफोन-आयडियाने गेल्या वर्षीच बेंगळुरु आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये आपली 3 जी सिम सेवा बंद केली आहे. आता दिल्लीतही ही सेवा बंद करण्याचं कंपनीने जाहीर केलंय. त्यामुळे दिल्लीचे Vi ग्राहक आपल्या जवळच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये जाऊन आपलं सिम कार्ड 4 जी मध्ये पोर्ट करु शकतात. यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारलं जाणार नाही.

जुन्या सिमवर इंटरनेटचा वापर करु शकणार नाहीत

Vodafone Idea (Vi) चे सध्याच्या 2जी युजर्सची व्हॉइस कॉलिंग सेवा सुरूच राहणार आहे. मात्र, ते जुन्या सिमवर इंटरनेटचा वापर करु शकणार नाहीत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियानुसार (TRAI), दिल्ली सर्कलमध्ये Vi चे एक कोटी 62 लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. यातील 3जी युजर्सना आता 15 जानेवारीपर्यंत आपलं सिम 4जीमध्ये पोर्ट करावं लागेल.