मी महाराष्ट्रातील मायबाप जनतेला साष्टांग दंडवत घालतो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आज वर्षपूर्ती होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून प्रहार केला आहे.मुख्यमंत्री म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणाने मी महाराष्ट्रातील मायबाप जनतेला साष्टांग दंडवत घालतो. चमत्कार हा शब्द वापरला त्याला काहीजण विरोध करतील. काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धांविरोधी कायदा आला त्यामुळे या चमत्कार शब्दाला काहीजण आक्षेप घेतील. त्यामुळे मी इतकचं म्हणले की सर्वजण एकत्र आले तर आणि तरच हे सत्य आहे ते दिसू शकतं.

ठीक आहे, हात धुतो आहे,जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन

आमच्याकडेही मालमसाला आहे, पण सुडाचे राजकारण करायचे नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपला इशारा दिला.मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करुन महाविकास आघाडी सरकारने हे सरकार चालणार नाही असं म्हणणाऱ्यांचे दात पाडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, ठीक आहे, हात धुतो आहे,जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन. हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका.कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते.कोणी कितीही आडवे आले त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल.

संस्थांचा वापर महाविकास आघाडीच्या
आमदारांवर धाडी घालून दहशतवाद आणि दडपशाही करताहेत.

ईडीसारख्या संस्था ज्या केंद्र सरकारच्या हातात आहेत. त्या संस्थांचा वापर महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशतवाद आणि दडपशाही करताहेत. जेणेकरून आमदारांनी गुडघे टेकावेत. मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक गोष्ट काही लोक विसरतात की,तुम्ही जो म्हणालात तो चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीत आहे. तेज आहे. महाराष्ट्रावर अनेक संकटं आली. आपत्त्या आल्या. भलेभले अंगावर आले, पण काय झालं? अंगावर येणाऱयांना शिंगावर घेतलं माझ्या दसऱयाच्या भाषणात मी तेच बोललो होतो.

महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही वाघाची अवलाद आहे.

माझ्या आजोबांच्या पहिल्या मेळाव्याच्या भाषणाचा संदर्भ दिला होता की, महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. वाघाची अवलाद आहे.महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल किंबहुना महाराष्ट्राला कोणी डिवचेल तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील आणि अशी ही संकटं अंगावर घेत पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला,महाराष्ट्र कधी थांबला नाही. महाराष्ट्र कधी थांबणार नाही.

कुणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणाऱयांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल

कुणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणाऱयांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल. म्हणून महाराष्ट्राला आव्हानं देणाऱयांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे,आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आकुणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणाऱयांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईलहे. आम्हीही मागे लावू शकतो.