अन्याय निवारण समितीचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे आणि सहकाऱ्यांच्या उपोषणाला यश

अहमदनगर/प्रतिनिधि : पारनेर सैनिक बँकेचे शाखाअधिकारी सदाशिव फरांडे व क्लार्क दीपक अनारसे यांनी संगनमताने संजय गांधी निराधार योजनेतील मयत लोकांची रक्कम हडप केली आहे.फसवणूक,अपहार केल्याच्या आरोपावरून कलम ४०९’,४०६,४२०,३४, नुसार कर्जत पोलिस ठाण्यात कर्जत तहसील कार्यालयातील कारकुन सुनील उगले यांनी मंगळवारी सदाशिव फरांडे, दीपक अनारसे यादोघांवर शासकीय गुन्हा दाखल केला आहे.     

कर्जत तहसील कार्यालयातील कारकुन सुनील उगले यांनी फिर्यादित म्हटले आहे की पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत शाखाधिकारी सदाशिव फरांडे व क्लार्क दीपक अनारसे यांनी संगनमताने राजीव गांधी निराधार योजना व इतर योजनेतील मयत लोकांची अनुदान रक्कम शाखाआधिकारी सदाशिव फरांडे यांचे वडील जयवंत फरांडे व इतर लोकांच्या नावावर लाभार्थी यादीत नाव नसताना जमा केली आहे .

ही बाब निदर्शनात आल्यावर हा घोटाळा उघड झाला त्यामुळे मयत लोकांची रक्कम स्वताच्या फ़ायद्यासाठी व आधिकाराचा गैरवापर करत लाखो रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा शाखाधिकारी सदाशिव फरांडे व क्लार्क दीपक अनारसे याच्यावर दाखल केला आहे.   

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या बॅंकेत फसवणूक झाल्याचे आतापर्यंत ४ ते ५ गुन्हे दाखल झाले आहेत आता तर शासकीय रक्कमच हडप केल्याचा शासकीय गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे बँकेत संचालक मंडळाचा व कर्मचारी यांचा गैरकारभार चव्हाटयावर आला आहे.

सदाशिव फरांडे, दीपक अनारसे यांनी संगनमताने अनेक वर्ष मयत लोकांची रक्कम परस्पर स्वतःच्या नातलगांच्या खात्यात जमा केली. वैभव पाचारने यांनी तक्रार केल्यावर सहकार खात्याच्या तपासणीत ही बाब उघड झाली व तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यानां दिला त्यामुळे हा अपहार उघड झाला.सरकारी लेखापरीक्षकांच्या अहवालात गुन्हाची व्याप्ती मोठी असल्याची नोंद आहे.त्यामुळे अहवालाच्या आधारे हा घोटाळा करण्यात काही अधिकारी व संचालक सहभागी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणुन तक्रारकर्ते वैभव पाचारने,व अरुण रोडे यांनी मंगळवार पासून नाशिक आयुक्त कार्यालया समोर उपोषण सुरु केले होते .त्यावर आयुक्त यांनी लेखापरीक्षक यांच्या अहवालाचे अवलोकन करून जे दोषी असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र पाचारने व अरुण रोडे यांना दिले असल्याने मंगळवार पासून नाशिक आयुक्त कार्यालया समोर सुरु असलेले उपोषण रोडे यांनी सोडले.