माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळून स्थापन केलेले सरकार अवघ्या ८० तासांत पडले.भल्या पहाटे राजभवनवर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.त्या पहाटे मिळालेल्या धक्क्यातून अजून भाजप सावरलेलं नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी,वो सुबह फिर नही आयेगी असा टोला देवेंद्र फडणवीसांना लगावला.

लव्ह जिहाद मुद्द्यावरून सर्वत्र चर्चा होत आहे. राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा करा, अशी मागणी होत आहे.यावर शिवसेना खासदार संजय राऊत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. लव्ह जिहाद संदर्भात सकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.लव्ह जिहादवर बिहारमध्ये भाजपचं सरकार काय कायदा करणार, ते पाहून मग महाराष्ट्रात काय करायचं ते बघू, असे संजय राऊत म्हणाले.लव्ह जिहादवर कायदा कधी करणार,अशी विचारणा होतेय.

आधी बिहारमध्ये कायदा येऊ देत, मग महाराष्ट्रात काय करायचं ते बघू, असे राऊत म्हणाले.वाढीव वीजबिलाबाबत राऊत म्हणाले, यासंदर्भात सरकार, मुख्यमंत्री निर्णय घेतील. जागतिक स्तरावर कच्चं तेल स्वस्त झालंय, इंधन दर कमी का होत नाहीत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपचं आंदोलन कोरोना रोखण्यासाठी की वाढवण्यासाठी, विविध मुद्द्यांवरून आंदोलन करणाऱ्या भाजपवर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.

भाजप नेत्यांना विविध मुद्दे मांडायचे असतील तर मंत्र्यांना भेटा.उद्धव ठाकरे जनतेच्या हिताचा निर्णय घेतील. सध्या राज्यात लव्ह जिहाद नव्हे तर कोरोना मुख्य संकट आहे,असे राऊत म्हणाले. शरद पवारांचा सल्ला घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोंदींजींचे राजकारण सुरू असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.