भारती सिंहच्या घरावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ अढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

दरम्यान सोशल मीडियावर भारतीचे पाच वर्षांपूर्वीचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. या ट्विटवरुन तिला ट्रोल केले जात आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले भारतीचे हे ट्विट पाच वर्षांपूर्वीचे असून ड्रग्जशी संबंधीत आहे. तिने ट्विटमध्ये ‘कृपया ड्रग्ज घेणे बंद करा. ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत’ असे म्हटले होते. आता एनसीबीकडून अटक झाल्यानंतर पुन्हा तिचे हे जुने ट्विट चर्चेत आहे.