
अहमदनगर (संगमनेर २३ नोव्हेंबर २०२०) : काँग्रेस पक्षाला मोठी समृद्ध परंपरा असून ती राज्यघटनेशी बांधील अशी विचारधारा आहे. काँग्रेसने अनेक संकटातून पुन्हा उभारी घेतली असून जमिनीवरचा कार्यकर्ता हीच या पक्षाची ताकद राहिली आहे.आगामी काळात युवकांना काँग्रेस पक्षातून मोठी संधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले असून अहमदनगर जिल्ह्यातील युवक काँग्रेस व नवीन पदाधिकार्यांच्या नियुत्त्या व सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. अमृता लॉन्स येथे युवक काँग्रेस व एनएसयूआयच्यावतीने आयोजित स्नेहमेळावा व नवीन पदाधिकार्यांच्या निवड सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी करण ससाणे, अहमदनगर शहराध्यक्ष किरण काळे,सचिन गुजर, कार्याध्यक्ष सोमेेशर दिवटे, निखील पापडेजा, अजय फटांगरे,मनोहर पोटे, प्रशांत ओगले आदी उपस्थित होते. यावेळी सत्यजीत तांबे म्हणाले, की काँग्रेस पक्षाने अनेक अडचणी पाहिल्या आहेत. जमिनीवरील कार्यकर्ता हीच या पक्षाची खरी ताकद राहिली आहे.जन माणसांचा काँग्रेस पक्षावर मोठा विेशास असून प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष सोडला त्यांची सध्या खूप वाईट अवस्था आहे. तरुणांनी सातत्याने लोकांची कामे करा व कामांचा सातत्याने पाठपुरावा करा. लोक तुमच्या पाठीमागे उभे राहतील. आगामी काळात तरुणांनी राजकारणात काँग्रेस पक्षातून मोठी संधी असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरुणांनाच प्राधान्य दिले जाईल.
यावेळी सुरेश थोरात,दत्तात्रय कोकणे, गौरव डोंगरे,आनंद वर्पे, सुभाष सांगळे, नानासाहेब वाघ, नितीन अभंग, रमेश गुंजाळ, शैलेश कलंत्री, अभिजीत लुनिया आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत निखिल पापडेजा यांनी केले. प्रास्ताविक सोमेेशर दिवटे यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर राजू बोर्हाडे यांनी आभार मानले.
