
किरकोळ कारणावरून झालेले भांडण मला मिटीवायचं आहे ; कपिल आमच्यातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी नक्की करेल : कृष्णा अभिषेक
सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार प्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शो आपण सर्व पाहत असतो आणि या हास्य कार्यक्रमात अनेक बॉलीवूड कलाकार आपल्या फिल्म प्रोमोशनसाठी नेहमी येतात आणि कपिल शो मध्ये धमाल करतात यामध्ये सपना बनून येणारी कलाकार म्हणजेच कृष्णा अभिषेक हा आपल्या डान्सिंग एन्ट्री ने आणि कॉमेडीच्या विशिष्ट शैलीने पाहुण्यांचे दर्शकांचे मन जिंकतो परंतु जेव्हा पण या कार्यक्रमात त्याचा मामा बॉलीवूड सुपरस्टार गोविंदा येतो तेव्हा भाचा कृष्णा कधीच येत नाही.

बाकी सगळ्या एपिसोड मध्ये हजारो वेळा मामाचा भाचा गोविंदा सारखे डान्स स्टेप करून नेहमी मामा-भाचा किती ग्रेट त्यांचे नाते आहे असे वाटत असतांना नेहमी मामा गोविंदा द कपील शर्मा शो मध्ये येतो तेव्हा भाचा कृष्णा गैरहजर का होतो यावर स्वतः कृष्णाने स्पष्टीकरण दिले आणि त्यांच्या भांडणाचे कारणही स्पष्ट केले आणि हा किरकोळ कारणावरून झालेले भांडण मला मिटीवायचं आहे असं कृष्णा ने स्पष्ट केल आणि कपिल आमच्यातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी नक्की करेल अशी आशा त्याने व्यक्त केली

कृष्णा अनेकदा मामा गोविंदाची नक्कल करताना दिसतो. मात्र दोघांमधील मतभेद दीर्घकाळापासून सुरु आहेत. अर्थात आता कृष्णाला हे मतभेद संपवायचे आहेत आणि खास म्हणजे, हे मतभेद संपवण्यासाठी कृष्णाला कपिलची मदत हवी आहे. मला मतभेद संपवायचे आहेत.

कृष्णा मामा गोविंदासोबतच्या मतभेदांवर बोलला. मामा व माझ्यात काही मतभेद आहेत. काही गैरसमज त्याला कारणीभूत ठरले. गेल्या काही वर्षांपासून मी मामासोबत बोललेलो नाही. मामा शोमध्ये येणार हे कळल्यावरच मी या एपिसोडमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या एपिसोडमध्ये खरे तर मला सुपरस्टार गोविंदाला ट्रिब्यूट द्यायचा होता. पण माझा एखादा विनोद मामाला आवडला नाही तर उगाच आणखी मतभेद व्हायचे. त्यापेक्षा नकोच, म्हणून मी या एपिसोडमध्ये दिसलो नाही.

कारण मी या भांडणाला कंटाळलो आहे. मला हे भांडण मिटवायचे आहे. कदाचित कपिल शर्मा यासाठी मला मदत करु शकेल, असे कृष्णा यावेळी म्हणाला.

कृष्णा व गोविंदा यांच्या वादाचे कारण ठरले होते एक ट्वीट.कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने एक ट्वीट केले होते. त्यात लोक पैशांसाठी नाचतात असा उल्लेख करण्यात आला होता. हे ट्वीट गोविंदासाठी केले असा गोविंदाच्या कुटुंबियांचा समज झाल्याने त्यांनी कृष्णाच्या कुटुंबियांशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कश्मिराने हे ट्वीट नणंद बहीण आरती सिंगसाठी (कृष्णाची बहीण) टाकले होते असे स्पष्टीकरण कृष्णाने दिले होते.”
