मुंबई– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सहा वर्षांच्या कालावधीसाठी नामनिर्देशित करण्यासाठी 12 उमेदवारांची यादी सुपूर्द करणार आहेत. सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या इच्छुकांच्या याद्या भल्यामोठ्या असून राष्ट्रवादीचे साधारण 300, काँग्रेसचे 50 तर शिवसेनेचे 15 यांनी राज्यपालांच्या कोट्यातून वरच्या सभागृहात उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र तिनही पक्षातील चर्चेअंती प्रत्येक पक्षातून चार-चार उमेदवारांची नावे दिली जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.


शिवसेना – सुनिल शिंदे,सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर,राहुल कनाल, अर्जुन खोतकर, आदेश बांदेकर

राष्ट्रवादी – एकनाथ खडसे,आनंद शिंदे, उत्तमराव जानकर,रविकांत वर्पे, विजय भाम्बले

काँग्रेस – महेश मांजरेकर,उर्मिला मातोंडकर, मुझफ्फर हुसैन, हर्षवर्धन सपकाळ,मोहन जोशी, नसीम खान,सत्यजीत तांबे, सचिन सावंत,
अतुल लोंढे, डी पी सावंत.