
अहमदनगर (दि २८ ऑक्टोबर २०२०) – हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.स) यांचे ईद- मिलादुन्नबी निमित्त शुक्रवार (दि.30) रोजी जिल्ह्यात दारु बंदी करण्यात यावी या मागणीचे निवेदन अहमदनगर सोशल क्लब फौंडेशन ट्रस्टच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे,अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे प्रेषित व समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी अवतरलेले रहमतुलिल आलमीन हजरत मोहम्मद सल्ललाहो ताआला अलैहे व सल्लम यांचे जन्मदिन 12 रब्बीऊल अव्वल ईद-मिलादुन्नबी यंदाच्या वर्षी शुक्रवारी साजरी होणार असुन या दिवशी अहमदनगर शहराबरोबरच जिल्ह्यात दारु बंदी करावी. महाराष्ट्र शासनाला कळवुन राज्यभरात ही या पवित्र दिवसी दारुबंदीची अंलबजावणी व्हावी अशी मागणी आहे. निवेदनावर नईम सरदार, इंजि.इम्रान हाजी अन्वर खान, कासम भाई केबलवाले, मोसीम शेख, हमजा चुडीवाला, दानिश शेख, राजमोहम्मद नुरी, जावेद शेख, अरयान नई आदींंच्या सह्या आहेत.
