
अहमदनगर (दि २३ ऑक्टोबर २०२०) : पोलीस खात्यात 33 वर्षे सेवा करणे सोपे काम नाही. सुरुवातीला पोलीस शिपाई या पदापासून भरती होऊन त्यानंतर आपली कार्यकुशलता सिद्ध करीत मजल दरमजल करीत पोलीस नाईक, हेड कॉन्स्टेबल त्यानंतर सहाय्यक फौजदार व आता पोलीस उपनिरीक्षकपदापर्यंत उपस्थित सर्वजण पोहोचले आहेत.
33 वर्षे पोलीस खात्यात सेवा करून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचलेल्या माझ्या सर्व सहकार्यांचे मी विशेष अभिनंदन करतो. या सर्वांनी आतापर्यंत चांगले काम केले असून, यापुढील काळातही ते अतिउत्कृष्ट काम करून पोलीस खात्याची मान उंचावतील, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी केले.
पोलीस खात्यातील 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहायक फौजदार मधुकर शिंदे, अनिल गाडेकर, नवनाथ दहातोंडे, शैलेंद्र जावळे, अशोक लाड, अनिल भारती व दीपक पाठक यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. या सर्वांनी 2013मध्ये परीक्षा दिली होती. त्यानंतर नियमानुसार बढती घेत ते येथपर्यंत पोहोचले आहेत.
या सर्वांचा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.स्थानिक अन्वेषण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनीही बढती मिळाल्याबद्दल सहकार्यांना शुभेच्छा दिेल्या.
