अहमदनगर (दि २३ ऑक्टोबर २०२०) : भिंगारमध्ये बर्‍याच वर्षापासून पाण्याची समस्या आहे. ही समस्या सुटण्यासाठी भाजपाने पुढाकार घेत मनापा कडे भिंगारसाठी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मुळा धरणात जरी पाणी मुबलक असले तरी सध्या नगर शहरालाच पाण्याची कमतरता भासत आहे. तरीही शहरातला जीवनदायी ठरणारी अमृत योजना पूर्ण क्षमतेने कार्यंवीत झाल्यानंतर संपूर्ण शहराला मुबलक पाणीपुरवठा झाल्यानंतर उरलेले पाणी भिंगार शहराला देता येईल. यासाठी मी पूर्णपणे सहकार्य करेल, असे आश्वासन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले. भिंगार शहराचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी महापालीकेच्या माध्यमातून भिंगार शहराला पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी भाजपाच्या वतीने महापौर व आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

त्यानुसार आज महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व अधिकारींची महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार, छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे उपाध्यक्ष शिवाजी दहीहंडे, काँन्टेेमेंट नगरसेविका शुभांगी साठे, भिंगार शहराध्यक्ष वसंत राठोड, जेष्ठनेते अभय आगरकर, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज दुल्लम अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहीदास सातपुते, संजय ढोणे, विलास ताठे, उदय कराळे, रवी बाकलीवाल आदी उपस्थित होते. यावेळी छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी भिंगारच्या छावणी परिषदेच्या पाणीपुरवठ्याची माहिती देवून शहराला एम.ए.एस. कडून व्यावसायिक दराने पाणीपुरवठा होत आहे. मात्र कायम विस्कळीत असल्याने भिंगारच्या नागरिकांना चार – पाच दिवस पाणीपुरवठा होत नाही. मनपाने जर भिंगारला पाणी दिले तर पाईपलाईनचा खर्च छावणी परिषद करेल, असे सांगितले.

आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मनापा अभियंतांकडून तांत्रिक बाबी समजून घेतल्या. शहराचा पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम न करता मनपाला भिंगारला पाणीपुरवठा करता येईल का याबाबत अहवाल द्यावा अश्या सूचना केल्या. जिल्हा सरचिटणीस महेश नामदे यांनी विस्कळीत पाण्यापुरावठ्यामुळे भिंगारच्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. चार – पाच दिवस नागरिकांना पाण्याविना राहावे लागते. त्यामुळे महापालिकेने आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी केली. भाजपा शहराध्यक्ष महेंद्र गंधे यांनी महापौर व आयुक्तांनी भिंगारच्या शिष्ठमंडळाच्या मागणीचा तत्काळ विचार करावा असे सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बैठकीत आश्वासन दिल्यानंतर शिवाजी दहीहंडे यांनी सर्वांचे आभार मानले.