दिनांक: २० ऑक्टोबर, २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत अहवाल

आज ५४१ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

आतापर्यंत ५० हजार ९१८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४६ टक्के

अहमदनगर: जिल्ह्यात आज ५४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९१८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.४६ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १६०६ इतकी आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ११५, अकोले ३३,जामखेड २३, कर्जत २१, कोपरगाव २१, नगर ग्रा ३६, नेवासा २६, पारनेर ३३, पाथर्डी ३६, राहाता ३२, राहुरी १५, संगमनेर ५२, शेवगाव १४, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल १०,इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५०९१८*

उपचार सुरू असलेले रूग्ण:१६०६

मृत्यू:८१३

एकूण रूग्ण संख्या:५३३३७

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

माझेकुटुंबमाझी_जबाबदारी