
मुंबई : मुंबई महापालिकेत प्रभारी निवडणुकीवरुन सुरु झालेला सत्ताधारी विरुद्ध आयुक्त वाद अखेर मिटला आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अखेर महापौर किशोरी पेडणेकर तसेच सभागृह नेत्यांची माफी मागितली आहे. “मला लहान भाऊ समजून माफ करा,” असे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापौर पेडणेकर यांना सांगितले. मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आयोजित केल्या होत्या. मात्र या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारीही गैरहजर राहिले.
त्यावरुन महापौरांनी आक्रमक पावित्रा धारण करत दालनातच ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी महापौरांनी आयुक्तांनी फोनवर उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोपही केला होता.याप्रकरणी वाद वाढत असतानाच आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापौर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना फोन केला. मला लहान भाऊ समजून माफ करा, असे चहल महापौरांना म्हणाले. यानंतर महापौरांनीही लहान भावानंही यापुढे मोठ्या बहिणीचं ऐकावं, अस सांगत या वादावर पडदा टाकला.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आज (14 ऑक्टोबर) पार पडणार होत्या. सकाळी 10 वाजता ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी महापौर आणि नगरसेवक सकाळी 9.30 पासून हजर होते.पण या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी गैरहजर राहिले. तर चिटणीस विभागातील दोनच कर्मचारी उपस्थित होते. बाकी कर्मचारी गैरहजर होते. तसेच जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तही गैहरजर राहिले. संबंधित वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने महापौर आक्रमक झाल्या.

Hey I am so glad I found your blog page, I really found
you by accident, while I was looking on Aol for something else, Nonetheless I am
here now and would just like to say many thanks for a tremendous post and a all round interesting blog (I also
love the theme/design), I don’t have time to look over it all at the minute but
I have bookmarked it and also included your RSS feeds, so when I
have time I will be back to read much more, Please do keep up the superb work. https://parbrize-online.ro/parbrize/parbriz-chevrolet-sierra_hatchback_gbc_-2013-192838.html
LikeLiked by 1 person