पुणे (दि १२ ऑक्टोबर २०२०) : पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०६८६४ झाली आहे आणि आतापर्यंत २६८५२६ कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या ३१२८२ ऍक्टिव्ह पुणे जिल्ह्यात आहेत आणि आतापर्यंत ७०५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनातून पूर्णपणे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ८७.५१ टक्के आहे अशी माहिती विभागीय आयुक्त,पुणे यांनी दिली आहे. हि आकडेवारी ११ ऑक्टोबर २०२० रात्री ९ वाजेपर्यंतची आहे.