ना.रावसाहेब दानवे यांच्या टीकेला ना.अनिल देशमुख यांचे उत्तर

मुंबई :  महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका नामदार रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तितक्याच शायराना अंदाजात उत्तर दिलंय. रावसाहेब दानवे यांच्या टीकेला अनिल देशमुख यांनी उत्तर देताना म्हटलंय,  “दानवेंच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी !”

रावसाहेब दानवे यांनी ‘अमर अकबर अँथोनी’ या हिंदी चित्रपटाचा संदर्भ देत महाविकास आघाडीचं हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केली होती. तसंच महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. ते स्वत:च्याच कर्माने पडतील, असं दानवे म्हटले होते.

“दानवे म्हणतात ते खरं आहे. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी!