अहमदनगर : मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिति महाराष्ट्र राज्य (MASS) संघटनेची अहमदनगर येथे संघटनेचे प्रदेश महासचिव मा. डॉ परवेज़ अशरफी यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली . या बैठकीत संघटनेची सविस्तर माहिती डॉ परवेज अशरफी यांनी दिली. MASS संघटना ही मुस्लिम समाजाचे हक्का साठी, आरक्षण, स्वरक्षण आणी समाजातील अनेक प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी बांडील आहे. या बैठकीत प्रदेश अध्यक्ष रशीद शेख व प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या आदेशाने व प्रदेश महासचिव यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे व शहरात संघटन मजबूत करण्यासाठी पद अधिकारी नेमण्यात आले. निवडीचे पत्र प्रदेश महासचिव डॉ परवेज अशरफी यांच्या हस्ते देण्यात आले. या बैठकीत शहरातील सामाजिक कार्यकर्ते मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.   या बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.हाजी जावेद ,जिल्हासचिव मा. फिरोज भाई शेख , एम आय एम जिल्हा संपर्क प्रमुख क़दीर भाई शेख,शाहनवाज़ तांबोळी, शाहबाज़ सय्यद , इमरान शेख , मूसैफ़ शेख  , कय्यूम कुरेशी, शाहबाज़ खान, शाहरुख खान , फैज़ान कुरेशी , मुन्ना शेख आदि उपस्थित होते. उपस्थितांनी मुफ्ती अल्ताफ यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . मुफ्ती अल्ताफ  यानी सर्वांचे आभार मानले व संघटना मजबूत करण्यासाठी सदयव बांधील राहील अशी गवाही दिली.मुफ्ती अल्ताफ यांची निवड झाल्याने त्यांचा अभिनंदन करण्यात आले.

सकल मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मुस्लिम आरक्षण समितिच्या माध्यमातून मोठा लढा उभारणार : मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी

अहमदनगर मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने दिलेली हि मोठी जबाबदारी असून सकल मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मुस्लिम आरक्षण समितिच्या माध्यमातून मोठा लढा उभारला जाईल आणि सकल मुस्लिम समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सम्पूर्ण महाराष्ट्रातील समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेउन पुढील योजना आखण्यात येणार असल्याचे मुफ्ती अल्ताफ मोमीन अहमदनगरी यांनी सांगितले.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून वेळप्रसंगी आक्रमक आंदोलन करणार : मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी

महाराष्ट्रातील राहणाऱ्या मराठी भाषिक सकल मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन चर्चा करणार असून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा आपल्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा नक्कीच मिळेल असेही मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी यांनी नमूद केले. गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले सकल मुस्लिम समाजाचे आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून वेळ प्रसंगी आक्रमक आंदोलन आणि निदर्शनेहि करण्याची आमची तयारी आहे आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांबरोबरच महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिक मुस्लिम समाजाला लवकरच त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल.