मुंबई (३ ऑक्टोबर २०२०) : अनेक दिवसांपासून संपूर्ण देशात चर्चिला गेलेला बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर त्याने हत्या केली असल्याचा आरोप होत होता पण यावर एम्सचा (AIIMS) रिपोर्ट आल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आज आलेल्या एम्सच्या रिपोर्टवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली. ज्या लोकांनी CBI ची मागणी करून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला त्यांच्या कानफटात बसली, अशा शब्दात किशोरी पेडणेकर विरोधकांना झापलं. सुशांतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचा अहवाल एम्सनं दिला आहे. याआधीही विष प्रयोग झालाच नसल्याचं एम्सनं म्हटलं होतं. पण तरीदेखील CBI चौकशीची मागणी करून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्यात आला होता.

सुशांतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. याआधीही एम्सच्या विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता.सुशांतसिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या.

सुशांत आत्महत्या प्रकरणात हत्येसह अनेक संशय व्यक्त करण्यात आले होते. मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, या शवविच्छेदन अहवालात योग्य माहिती न देण्यात आल्याने कूपर रुग्णालयाच्या या अहवालावर देखील संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे एम्सच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमून या अहवालाचा पुन्हा अभ्यास केला गेला.एम्सच्या (AIIMS) या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा अहवाल सादर केला. या अहवालानुसार त्याच्यावर कुठलाही विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर त्यांनी आता सुशांतच्या हत्येची शक्यताही नाकारली आहे.