
अहमदनगर (२ ऑक्टोबर २०२०) : मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेल्या काळ्या कायद्यांचा विरोधात अहमदनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित मार्केट कमिटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ धरणे आंदोलन करत निदर्शने करण्यात आली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आंदोलनात यावेळी काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हा निरीक्षक डॉ. अनिल भामरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दिप चव्हाण, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष अज्जूभाई शेख, तालुका युवक काँग्रेसचे नेते अक्षयभाऊ कुलट, क्रीडा विभागाचे प्रवीण गीते, शानुभाई शेख, कोकाटे सर, लांडे सर, जयंतराव वाघ, शिल्पाताई दुसुंगे, शरदभाऊ ठोंबरे, विद्यार्थी शहर अध्यक्ष दानिश शेख, मुबीन शेख, अन्वर सय्यद, दीपक घाडगे, योगेश काळे, चंद्रकांत उजागरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे अन्वरभाई सय्यद यांचे केंद्र सरकारच्या निषेधार्थ मुंडण : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे अन्वरभाई सय्यद यांनी मोदी-योगी सरकारच्या निषेधार्थ मुंडन केले. या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या, त्याचबरोबर शेतकरी, कामगारांच्या तीव्र भावना सरकारच्या नजरेत आणून देण्याचे काम करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मार्केट कमिटी परिसर दणाणून सोडला.





