
*दिनांक: ०२ ऑक्टोबर, २०२० दुपारी १२ वाजेपर्यंत अहवाल*
*आज ७५५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*
*आतापर्यंत ४० हजार ३१७ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९८ टक्के*
*आज ३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
अहमदनगर (दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२०) : जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४१७ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, जामखेड ०४, नगर ग्रामीण ०४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ७५५ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १६३, अकोले ४५, जामखेड ३५, कर्जत ४९, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण ३८, नेवासा २७, पारनेर २९, पाथर्डी ६१, राहाता ४५, राहुरी ३७, संगमनेर ८१, शेवगाव १४, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ५३, कॅंटोन्मेंट ०७, मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
